Dabidi Dibidi Trolling : डाकू महाराज आगामी चित्रपटातील दाबेडी डिबिडी नावाच्या नवीन गाण्यावर उर्वशी रौतेला आणि दक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता नंदामुरी बालकृष्ण हे चांगलेच स्ट्रोल झालेले दिसत आहेत. दाबेडी डिबिडी गाण्याच्या अश्लिल स्टेप मुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. हे गाणं प्रदर्शित होताच ६४ वर्षाच्या नंदामुरी बाळकृष्ण आणि अगदी निम्म्या वयाच्या म्हणजे ३० वर्षाच्या उर्वशीसोबतच्या अश्लिल डान्स स्टेपमुळे अगदी तिखट शब्दात नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

६४ वर्षांचे नंदामुरी बाळकृष्ण आणि अभिनेत्री उर्वशी राऊतेला झाली ट्रोल पहा नेमकं झालं काय ?
View this post on Instagram
उर्वशी राऊतेलाने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये या गाण्याचा BTS शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, हे संपूर्ण गाणे १२ जानेवारी २०२५ ला रिलीज होत आहे आणि या गाण्याला एक कोटीहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या आहेत आणि ही आमच्यासाठी नवीन वर्षाची एक परिपूर्ण भेट आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तिने चमकणारा काळा स्कर्ट आणि क्रॉप टॉप परिधान करून ट्रॅकच्या शूटमधून एक BTS व्हिडिओ टाकला आहे.

Urvashi Rautela Dabidi Dibidi Trolling comments :
पण या गाण्यावर युजर्स चांगलेच संतापलेले दिसत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “खुप जास्त वल्गर आणि क्रींज गाणं आहे” तर दुसरीकडे “अंकल थोडी तो शरम करो, वो तुम्हारी बेटी से भी छोटी हैं” असं लिहिलं आहे.अजुन एकाने लिहिले आहे की, “मला आश्चर्य वाटते की तिची परिस्थिती किती वाईट आहे की तिने हे करण्यास सहमती दिली.” दुसऱ्याने टिप्पणी केली, “तो तिला फक्त मारत नाही तो तिला अक्षरशः मारहाण करत आहे.” अशा प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
दरम्यान टाकू महाराज हा चित्रपट १२ जानेवारीला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होईल आणि या चित्रपटात बॉबी देवल हा खलनायकाच्या भूमिकेत आपल्याला दिसेल.
हे ही वाचा : पुष्पाने केजीएफ आणि बाहुबलीलाही टाकले मागे ! पहा बॉक्स ऑफिस कलेक्शन.
Best