पुष्पावर भारी पडला राम चरणचा गेमचेंजर, वाचा रिव्यू .

Game Changer Review : पुष्पाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमायी सुरू असताना जानेवारी महिन्यात त्याला टक्कर द्यायला राम चरणचा शंकर दिग्दर्शित गेम चेंजर हा सिनेमा रीलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घातला.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Game Changer Review
Game Changer Review

गेम चेंजर चित्रपटाचे संपूर्ण श्रेय हे चित्रपटाचे कथानक निर्माते ‘कार्तिक सुब्बा राज’ यांना जाते कारण त्यांनी जशाप्रकारे हा चित्रपट सादर केला आहे. तो कौतुकास्पद आहे. ज्यात भ्रष्टाचार मुक्त समाज आणि सुशासनाचा व्यापक दृष्टिकोन दाखवला आहे. शंकरच्या आधीच्या चित्रपटांमध्ये नायक मुख्य व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा सामान्य माणूस होता.

पण यावेळी शंकर रामचरणला जनतेचा नेता बनवतो आणि त्याला क्लीनअप ऑपरेशन करण्यासाठी बळ देतो या कथेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रकाश टाकण्यात आला आहे.चित्रपटाची सुरुवात नाटकीय रुपात होते सुरुवातीच्या भागात एक वृद्ध राजकारणी त्याच्या भूतकाळातील अडचणींमुळे पछाडलेला आहे. कथानक अशाप्रकारे मांडले आहे की, प्रेक्षक त्याच्यात गुंतून जातील. कौटुंबिक राजकारण हे केंद्रस्थानी ठेवून दोन भावांची म्हणजेच मनी मणिक्यम (जयराम) आणि बॉबी मोपीदेवी म्हणजेच ‘एस जे सूर्या’ या दोघात आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

Game changer storyline : हा चित्रपट मुख्यत आंध्र प्रदेशातील राजकारणावर केंद्रित आहे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोन्ही काळातील कथा चित्रपट सांगत आहे. कथेत विजयवाडा विशाखापट्टनम आणि विजयनगर मधील आसपासच्या भागावर चित्रपट केंद्रित करण्यात आला आहे तर हुशारीने 2014 मध्ये तेलुगु राज्यांच्या विभाजनाचा संदर्भ देखील टाळण्याची शक्यता दाखवण्यात आलेली आहे.

पहिल्या तासात चित्रपट एका सिक्वेन्स मधून दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये जबरदस्त वेगाने पळतो आणि तिथेच प्रमुख पात्रांच्या बुद्धी कौशल्याची ओळख करून देतो आणि कथा ही मध्यंतरापर्यंत गुंतून ठेवण्याचे काम करते.

अप्पाण्णा आणि त्याची पत्नी पार्वती म्हणजेच अंजली यांची कथा चित्रपटाच्या नंतरच्या भागात अधिक भावनिक करून जाते त्यामुळे कथेचा अंदाज लावता येत नाही कथा आकर्षक वाटते. शक्ती आणि पैसा कसा भ्रष्ट पद्धतीने एकमेकांशी जुळवून तो प्रभावीपणे पडद्यावर अधोरेखित केलेला आहे ज्यामुळे बाकीच्या चित्रपटाने असाच दृष्टिकोन अवलंबला पाहिजे. रामचरण च्या वडिलांच्या पत्नीचे म्हणजेच पत्नी पार्वतीचे जे अंजलीने पात्र साकारले आहे ते वाखण्याजोगे आहे आपल्या व्यक्तिरेखेसाठी तिची मेहनत पडद्यावर दिसुन येते.

Game changer 1st day box office collection : शंकरच्या आधीच्या चित्रपटांपैकी हा चित्रपट पाहण्यासारखा आहे त्याचा शेवटचा चित्रपट ‘इंडियन २’ पेक्षा तरी हा कितीतरी पटीने दमदार कथेसह पडद्यावर उतरतो गेम चेंजर हा चित्रपट पाहताना शंकरच्या अपरिचित, रोबोट,भारतीय येवडू, जेंटलमन या चित्रपटाची आठवण येते. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि भारतातून तब्बल 188 कोटी आकडा प्राप्त केला.

ही देखील वाचा : हॉलीवुडचे २०२५ मध्ये येणार हे सहा दिग्गज सिनेमे पहा लिस्ट…