Site icon

पुष्पाने केजीएफ आणि बाहुबलीलाही टाकले मागे ! पहा बॉक्स ऑफिस कलेक्शन.

Pushpa 2 box office collection

Pushpa 2 box office collection

Pushpa 2 box office collection : ‘अल्लू अर्जुन’ आणि ‘रश्मिका मंदन्ना’ यांचा पुष्पा २ हा सिनेमा ६ डिसेंबर २०२४ रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि सगळीकडे त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. पुष्पा १ च्या मागील भागानंतर ही जोडी परत ऑन स्क्रीन केमिस्ट्रीला दुजोरा देत त्यांनी प्रेक्षकांना पुन्हा एकदा चकित करून सोडले. पुष्पा २ चे दिग्दर्शक सुकुमार यांनी ॲक्शन ड्रामा यात भरभरून भरला आहे. अल्लू अर्जुनचा स्वॅग, रश्मिका मंदनाची अदा आणि फहद फाजीलच्या मुख्य खलनायकाच्या भूमिकेत असलेला दणकट अभिनय प्रेक्षकांना आकर्षित करण्यात त्यांना पुरेपुर यश मिळताना दिसत आहे.

एकूण कलेक्शनचा आढावा:

एकूण कलेक्शन्स: ₹1208.83 Cr
पहिला आठवडा कलेक्शन: ₹725.8 Cr
दुसरा आठवडा कलेक्शन: ₹264.8 Cr
तिसरा आठवडा कलेक्शन: ₹129.5 Cr
चौथा आठवडा कलेक्शन: ₹69.65 Cr
पुढील दिवस (चौथ्या आठवड्यानंतर): ₹19.5 Cr

Pushpa 2 box office collection :

पहिल्या आठवड्यामध्ये सर्वाधिक कलेक्शन्स (₹ 725.8 Cr), त्यानंतर दुसरा आठवड्यामध्ये (₹264.8 Cr) कलेक्शन्स आले पण तिसरा आणि चौथ्या आठवड्यामध्ये कलेक्शनामध्ये तीव्र घट दिसून आली. शेवटच्या काही दिवसांत सिनेमाचं कलेक्शन अत्यंत कमी झालं. उदाहरणार्थ, सिनेमा रिलीज झाल्यापासून ३३ दिवसांमध्ये ₹2.5 Cr आणि ३४ दिवसामध्ये ₹0.13 Cr एवढी घसरण दिसत आहे.

आठवड्याच्या कलेक्शनचा टक्केवारी बदल:

पहिल्या आठवड्यात चित्रपटाची दमदार सुरुवात झाली आणि नंतरचे दिवस देखील ठिकठिकाणी उत्तम कलेक्शन्स करत राहिले. पहिल्या दिवशी (₹164.25 Cr) सर्वाधिक कलेक्शन झाले. नंतरचे दिवस, विशेषतः शनिवार आणि रविवार, ठीकठाक कलेक्शन देत राहिले पण दुसरा आठवडा पहिला आठवड्याच्या तुलनेत सिनेमाचे कलेक्शनामध्ये 60% पेक्षा अधिक घट झालेले दिसून आली.

याचबरोबर तिसऱ्या आठवड्यातही सिनेमाच्या कलेक्शनामध्ये घट झाली. परंतु काही दिवस (दिवस 17 आणि 18) मध्ये कलेक्शनामध्ये 73.08% आणि 33.13% इतकी वाढ दिसली पण या आठवड्यात चित्रपटाचा खेळ जवळपास संपलाच कारण एकूण कलेक्शन ₹20 Cr पेक्षा कमी राहिले, आणि 33 दिवसामध्ये ₹2.5 Cr आणि 34 दिवसामध्ये ₹0.13 Cr अशी कलेक्शनाची घट दिसली.

पुष्पा २ चित्रपटाचे सर्वाधिक कलेक्शन कोणत्या भागात झाले आहे.

पुष्पा २ ने तेलुगू भाषेत सर्वाधिक कलेक्शन्स मिळवले, तर हिंदीनेही विशेषतः सुरुवातीच्या दिवसात तुफान कमाई केली. तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमधील कलेक्शन तेलगू आणि हिंदी भाषेपेक्षा तुलनेत कमी आले, तरीही तमिळने सुरुवातीच्या काही दिवसात चांगली कामगिरी केली.

चित्रपटाची सुरुवात खूप चांगली झाली, विशेषतः पहिल्या आठवड्यात. मात्र, नंतरच्या आठवड्यांत कलेक्शनाचा आकडा तीव्रतेने कमी होऊ लागला, ज्यामुळे स्पष्टपणे असे दिसते की चित्रपटाचा प्रारंभ उत्साही असला तरी त्यानंतर रसिकांची आवड घटली. हा ट्रेंड मुख्यतः “फ्रंटलोडेड” चित्रपटांमध्ये दिसतो, जिथे प्रचंड प्रमाणात प्रारंभ असतो.

पण नंतरच्या तुलनेत कलेक्शन घटताना जाणवतात. कलेक्शन्सचा घटलेला ट्रेंड ही चित्रपटांच्या प्रतिस्पर्धात्मक कालावधीत किंवा ज्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस वर दर्जा घसरला आहे त्यासाठी ही सामान्य बाब मानली जाते. तरीही, चित्रपटाने पहिल्या दोन आठवड्यात चांगली कामगिरी केली, पण चौथ्या आठवड्यात कलेक्शन्स जवळपास थांबले.

हे ही वाचा :- ६४ वर्षांचे नंदामुरी बाळकृष्ण आणि अभिनेत्री उर्वशी राऊतेला झाली ट्रोल पहा नेमकं झालं काय ?

Exit mobile version