Shivarancha Chhava teaser Out: छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर दाखवणारा दिग्दर्शक दीग्पाल लांजेकर यांनी आता स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. शिवरायांचा छावा या आगामी चित्रपटाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसापासून दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित शिवरायांचा छावा या सिनेमाची चर्चा जोरदार रंगताना होताना दिसते. फक्तेशिकस्त, सुभेदार, पावनखिंड या सिनेमाच्या घवघवीत यशानंतर दिग्पाल लांजेकरांचा शिवरायांचा छावा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारनार
” कोणी शत्रू यावरी करील कैसा कावा, वाघालाही फाडतो हा शिवरायांचा छावा” असा कॅप्शन देऊन शिवरायांचा छावा चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. शिवरायांचा छावा या चित्रपटाचा जेव्हा पहिल्यांदा पोस्टर रिलीज झाला तेव्हा संभाजी महाराजांची भूमिका कोणाचा करणार याची चर्चा रंगू लागली होती यानंतर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आणि संभाजी महाराज कोण साकारणार हे समजले. या टीझरमध्ये छत्रपती संभाजी महाराज वाघाशी भिडताना दिसत आहेत अंगावर शहारे आणणाऱ्या या टीजरमध्ये अभिनेता भूषण पाटील हा संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
शिवरायांचा छावा सिनेमाचे पोस्टर रिलीज.
View this post on Instagram
छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवनात केलेला संघर्ष त्यांनी धैर्याने लढलेल्या लढाया या चित्रपटात दाखवणार आहेत. इतिहासाच्या पानापानांवर कोरलं गेलेला एक धगधगता ज्वाला म्हणजेच संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन चरित्र पडद्यावर दाखवण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी उचललं आहे. अशा पराक्रमी धाडसी शूरवीर संभाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर भूषण पाटील साकारणार आहेत त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता कमालीची वाढली आहे.
Shivrayan chhava release date
शिवरायांचा छावा चित्रपट या नवीन वर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांना मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे संभाजी महाराजांच्या धगधगत्या पराक्रमाची कथा दीपा लांजेकर यांनी लिहिलेली असून पटकथा संवाद आणि गाणी सुद्धा त्यांनीच लिहिलेली आहेत.
Shivarancha Chhava Moive Cast
शिवरायांचा छावा या चित्रपटात चिन्मय मांडलेकर हे छत्रपती शिवरायांच्या भुमिकेत पाहायला मिळतील तसेच तृप्ती तोरडमल, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र आणि मृणाल कुलकर्णी या कलाकारांची मुख्य भुमिका आहेत. प्रमुख म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका भुषण पाटील साकारणार आहे.