Site icon

हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे मराठी चित्रपट, तुम्ही पाहिले आहेत का ?

Top 8 Marathi Highest Grossing Movies

Top 8 Marathi Highest Grossing Movies

1.Sairat 2016

सैराट ने २०१६ साली महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता सैराट चे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एक्सेल विजन प्रोडक्शन आणि आटपाट प्रोडक्शन यांनी या सिनेमाची निर्मिती केली आणि अजय-अतुल यांनी सैराटला संगीत दिले. जगभरात सैराटने ११० कोटी एवढा गल्ला कमवला आणि मराठी मधला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला. सैराट हा चित्रपट Primevideo या ओटीटी वर आपल्याला पाहायला मिळेल.

2.Baipan Bhari Deva 2023

जिओ स्टुडिओ दिग्दर्शित बाई पण भारी देवा हा चित्रपट २०२३ साली रिलीज झाला या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले हा चित्रपट मुळतः वैवाहिक महिलांच्या संघर्षाची कहाणी दाखवतो त्यांच्या दररोजच्या अडीअडचणी आणि त्यातूनही त्या महिलेच्या महत्त्वकांक्षा अगदी स्पष्टपणे हा चित्रपट दाखवतो या चित्रपटाने जागतिक पातळीवर ८९.५० कोटी इतकी कमाई केली आहे. ‘बाई पण भारी देवा’ हा चित्रपट Hotstar या ओटीटी वर आपल्याला पाहायला मिळेल.

3.Ved

रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जिनीलिया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट २०२२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली अशोक सराफ यांच्यासारखा जबरदस्त नायक प्रेक्षकांना खूप वर्षानंतर पडद्यावर पाहायला मिळाला वेड चित्रपटाची निर्मिती मुंबई फिल्म्स कंपनी यांनी केले आणि जगभरात वेड ने ७५ कोटी इतका गल्ला जमवला. ‘वेड’ हा चित्रपट Hotstar या ओटीटी वर आपल्याला पाहायला मिळेल.

4.Natsamrat

वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक महेश मांजरेकर यांनी २०१६ व्यावर्षी मोठ्या पडद्यावर आणले या चित्रपटात गणपत रामचंद्र बेलवलकरांच्या भूमिकेत ‘नाना पाटेकर’ दिसले तसेच त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत ‘मेधा मांजरेकर’ दिसल्या. एका नटाचा थेटर संपल्यानंतरचा प्रवास या चित्रपटात दाखवला आहे आणि तो हृदय पिळवटून टाकणारा आहे या चित्रपटाचे प्रोडक्शन ‘फिनक्राफ्ट मीडिया आणि एंटरटेनमेंट’ आणि ‘ग्रेट मराठा’ यांनी केले आहे या चित्रपटाने जगभरात तब्बल ४८ कोटी इतकी कमाई केली आहे. हा चित्रपट Primevideo या ओटीटी वर आपल्याला पाहायला मिळेल.

5.Pawankhind

बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंडीत केलेला पराक्रम आणि अखेरच्या श्वासापर्यंत दिलेली गनिमांशी झुंज या चित्रपटात दाखवलेली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘दिग्पाल लांजेकर’ यांनी केले आहे आणि हा चित्रपट २०२२ साली सिनेमागृहात पाहायला मिळाला. या सिनेमाची निर्मिती ‘अलमोंड क्रिएशन’ आणि ‘ए एफ एम’ यांनी केले आहे या चित्रपटाने जगभरात तब्बल ४३ कोटी इतकी कमाई केली होती आणि हा चित्रपट आपल्याला ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

6.Katyar Kaljat Ghusali

२०१५ साली प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध भावे यांनी केले आहे. मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय नाटक’ कट्यार काळजात घुसली’ या नाटकावर आधारित हा सिनेमा आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुबोध भावे सचिन पिळगावकर अमृता खानविलकर मृण्मयी देशपांडे शंकर महादेवन एक कलाकार आहेत या सिनेमाने जगभरात चाळीस कोटी इतकी कमाई केली आहे. कट्यार काळजात घुसली हा चित्रपट आपल्याला zee5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

7.Timepass 2

दगडू आणि प्राजक्ता च्या प्रेमाची गोष्ट सांगणारा टाईमपास २ चित्रपट २०१५ साली सिनेमागृहात प्रदर्शित झाला. टाईमपास दोन चे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे आणि याची निर्मिती एक्सेल विजन प्रोडक्शन यांनी केले आहे या चित्रपटात प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट या कलाकारांनी प्रमुख भूमिका सादर केली आहे. या चित्रपटाने जगभरात ४० कोटी एवढा गल्ला कमावला आहे टाईमपास 2 हा चित्रपट आपल्याला zee5 या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

8.Lai Bhari

निशिकांत कामंत दिग्दर्शित ‘लयभारी’ असे सिनेमा २०१४ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला या चित्रपटात ‘रितेश देशमुख’ हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांनी या चित्रपटात दोन पात्रे साकारलेली आहेत. गावकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध त्यांनी आवाज उठवलेला या चित्रपटात पाहायला मिळतो या चित्रपटाने जगभरात 40 कोटी इतकी कमाई केली आहे या चित्रपटाची निर्मिती मुंबई फिल्म कंपनी यांनी केली आहे. लय भारी हा चित्रपट आपल्याला प्राईम व्हिडिओ या ओटीपी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल.

हे देखील वाचा : वादात सापडलेल्या विक्रांत मेस्सिचा साबरमती रिपोर्टबरोबर हे चित्रपट होणार ओटीटीवर रिलीज.

Exit mobile version